करोनाचे रत्नागिरीत २३, तर सिंधुदुर्गात १७ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२८ नोव्हेंबर) २३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तीन जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ नोव्हेंबर) करोनाचे नवे २३ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८७७२ झाली आहे. आज तपासलेल्या अन्य ७९ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर १३.८७ टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी १०, चिपळूण ३, राजापूर २ (एकूण १५). रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी १, चिपळूण १, संगमेश्वर ६ (एकूण ८). (दोन्ही मिळून २३).

जिल्ह्यात आज तीन रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८२४९ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.०४ टक्के आहे. सध्या १३४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३४ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. २५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला होता. त्याची नोंद आज झाली आहे. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३२० झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२८ नोव्हेंबर) १७ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५२५१ झाली आहे. सध्या २१५ जण उपचारांखाली आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ४८८६ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply