सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एसटी आगाराकडून टूर पॅकेज

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या रत्नागिरी विभागाने नाताळच्या, तसेच शनिवार-रविवारला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी टूर पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार पुढील मार्गांवर एसटी बस सेवा देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे. संबंधित
ठिकाणी राहण्याचा माफक खर्च प्रवाशांनी करायचा असून, बसभाड्याची माहिती खाली दिली आहे. किमान २५ प्रवाशांनी नोंदणी केल्यासच या सेवा दिल्या जाणार असून, त्यासाठी टू बाय टू बसेस दिल्या जाणार असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे.

रत्नागिरी ते कोल्हापूर दर्शन : या मार्गावर मुक्कामी फेरी सुरू करण्यात आलेली आहे. या फेरीची बस रत्नागिरी येथून सकाळी साडेसात वाजता सुटणार आहे. ती बस कोल्हापूर, ज्योतिबा, पन्हाळा येथे जाऊन आल्यावर महालक्ष्मी दर्शन घेऊन रंकाळा येथे मुक्कामी राहील. रंकाळा येथे महालक्ष्मी धर्मसंस्था शाळा येथे राहण्याची व्यवस्था असेल. तेथून दुसऱ्या दिवशी न्यू पॅलेस, भवानी मंडप, कण्हेरी मठ, शालिनी पॅलेस सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय या ठिकाणी जाऊन बस रत्नागिरीला परत येईल. धर्मशाळेचा माफक खर्च प्रवाशांनी करायचा असून, बस तिकिटाचा दर प्रति प्रवासी ५७० रुपये आहे.

रत्नागिरी ते पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर दर्शन : या मार्गावर मुक्कामी फेरी सुरू करण्यात आलेली आहे. रत्नागिरी-पंढरपूर ही फेरी रत्नागिरी येथून सकाळी सात वाजता सुटणार आहे. ही बस तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट येथे जाऊन अक्कलकोट येथे रात्री वस्ती करून नंतर रत्नागिरीला परत येईल. धर्मशाळेत राहण्याचा खर्च प्रवाशांनी करायचा असून, बस तिकिटाचा दर प्रति प्रवासी १२२५ रुपये आहे.

रत्नागिरी ते महाबळेश्वर : या फेरीची बस रत्नागिरी येथून सकाळी साडेसहाला सुटणार आहे. ही बस सातारामार्गे महाबळेश्‍वरला जाऊन खेड-चिपळूणमार्गे रत्नागिरीत परत येईल. बस तिकिटाचा दर प्रति प्रवासी ६०० रुपये आहे.

या फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण रत्नागिरी आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानकात जाऊन करता येणार आहे. या सेवेचा
लाभ घेण्याचे आवाहन रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी केले आहे.

संपर्क : (०२३५२) २२२५५३

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

 1. मा. कोनकर साहेब,
  संपादक कोकण मिडिया.

  ताज्या अंकातील आदरणीय श्री. सुरेश ठाकूर यांचा रापण संस्कृती आणि मच्छीमारी या बद्द्लचा लेख अप्रतिम आज सकाळी हा लेख वाचून मन प्रसन्न झाले अस्मादिक मत्स्यप्रेमी त्यातून कोकणातील मासे प्रदुषण विरहित आणि चविष्ट कुणाला सांगितले तर आश्चर्य वाटेल मी
  वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत भाजी खाल्लीच नाही. आमच्या
  कुटुंबाचे 5 मिठागर होते 1984 साली JNPT बंदरासाठी भूसंपादीत झाले. आरोग्य शास्त्रीय दृष्टीने मटण आणि चिकनपेक्षा पचायला हलकी
  तसेच त्यात मोठय़ा प्रमाणात प्रोटिन्स ओमेगा आॅईल फॅटी अॅसिड असते. सुरेशजी आपणास
  माझा सलाम 🙏🙏🙏👌👌

Leave a Reply