रत्नागिरीच्या ‘इन्फिगो’मध्ये आज आणि उद्या रेटिना तपासणी

रत्नागिरी : येथे नव्याने सुरू झालेल्या इन्फिगो आय केअर या अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज हॉस्पिटलमध्ये रेटिनातज्ज्ञ व लांज्याचे सुपुत्र डॉ. प्रसाद कामत आज (ता. २९) आणि उद्या (ता. ३० सप्टेंबर) हे दोन दिवस रेटिनाच्या रुणांची तपासणी करणार आहेत.

भांबेड (ता. लांजा, जि. रत्नागिरी) गावाचे सुपुत्र डॉ. श्रीधर ठाकूर यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलची साखळी तयार केली आहे. त्यातील पंधरावे रुग्णालय रत्नागिरीत नुकतेच सुरू झाले आहे. या रुग्णालयात डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, उपचार व्हावेत, याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आणि उद्या रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत रेटिनाविषयक तपासणी करणार आहेत.

डॉ. कामत हे चेन्नईच्या शंकर नेत्रालय येथील प्रशिक्षित रेटिना सर्जन असून इन्फिगो आय केअर ग्रुपचे डायरेक्टर ऑफ रेटिना सर्व्हिसेस म्हणून ते काम करतात. त्यांची सेवा महिन्यातून एक दिवस रत्नागिरीला लाभणार आहे. रत्नागिरीतही मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. मधुमेही रुग्णांच्या रेटिनावर परिणाम होतो. त्यामुळे काहीजणांना अंधत्व येते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी अशा रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. उच्च रक्‍तदाब असणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. ६० वर्षांवरील रुग्णांमध्ये मॅन्युअल डिजनरेशन हा रेटिनाचा आजार आढळतो. या साऱ्या रेटिनाच्या विकारांच्या निदानासाठी रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये तपासण्या केल्या जातात. ओसीटीमध्ये रेटिनाचा स्कॅन होतो. त्यातून सूक्ष्म दोष ओळखता येतात व इलाज केला जातो.

मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम, डोळ्यांचा पडदा किंवा रेटिना यांच्या व्याधी, डोळ्यांच्या पडद्यावरील डाग, लेझर उपचार, रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया किंवा सल्ला आवश्यक असणाऱ्या व्यक्‍तींनी रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठिकाण : इन्फिगो आय केअर हॉस्पिटल,
शॉप नं. ३/४/५, शांतादुर्ग संकुल,
साळवी स्टॉप, मेन रोड, रत्नागिरी

नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक : 9372766504

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply