यश नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहाचे रविवारी भूमिपूजन

रत्नागिरी : कोकणातील पहिल्या दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्या (दि. १० जानेवारी) होणार आहे. याच कार्यक्रमात माजी आमदार तथा फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वास्त बाळ माने यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे.

उद्या सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम मिरजोळे एमआयडीसीतील विमानतळासमोरील दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पटांगणावर होणार आहे. करोनाविषयक नियम पाळून सोशल डिस्टन्सिंगसह या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. नारायण राणे प्रथमच या कॉलेजमध्ये येत असून त्यांच्या हस्ते नर्सिंग कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

यावेळी श्री. माने यांचा ५६ वा वाढदिवस साजरा होणार असून नारायण राणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. श्री. माने ३५ वर्षे सक्रिय राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तळागाळातील लोकांनाही आपलेसे वाटणारे नेते अशी श्री. माने यांची ख्याती आहे. त्यांनी एकाच छताखाली ‘केजी टू पीजी शिक्षण’ ही संकल्पना घेऊन दि यश फाउंडेशनतर्फे प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कोकणातील पहिले नर्सिंग कॉलेज सुरू केले. या माध्यमातून हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी शिकले आणि नोकरी, व्यवसायात स्थिरावले आहेत.

दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बाहेरगावाहून येणार्या् विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन श्री. राणे यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला कॉलेजचे विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक, हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम निमंत्रित मंडळींसाठी होणार असून कोरोनाविषयक नियम पाळून करण्यात येणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply