Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्गात नवे ३५८ करोनाबाधित, २०६ घरी परतले

Photo by cottonbro on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे ३५८ रुग्ण आढळले, तर २०६ रुग्ण करोनामुक्त झाले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज, ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत २०६ आणि एकूण ३६ हजार ९९० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या १५ जणांसह नवे ३५८ करोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या आता ४२ हजार ९७९ झाली आहे.

सध्या जिल्ह्यात ४ हजार ९१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४१, दोडामार्ग – १४, कणकवली – ६१, कुडाळ – ५८, मालवण – ९३, सावंतवाडी – ३१, वैभववाडी – १४, वेंगुर्ले – २८.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६७०, दोडामार्ग १५६, कणकवली ८७९, कुडाळ १०१९, मालवण ९७९, सावंतवाडी ५२९, वैभववाडी २०७, वेंगुर्ले ४५५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी २४२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात दोघांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०७३ झाली आहे. आज नोंद झालेल्या दोन आणि आधी मरण पावलेल्या आणि आज नोंद झालेल्या एका मृताचा तपशील असा – देवगड १, कणकवली १, सावंतवाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १४१, दोडामार्ग – ३१, कणकवली – २१५, कुडाळ – १६४, मालवण – २१७, सावंतवाडी – १५१, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version