सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २५ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ८२८ आणि एकूण ३३ हजार ४२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ४२० करोनाबाधित आढळले. त्यामुळे नवबाधितांपेक्षा सुमारे दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी गेले.
सध्या जिल्ह्यात ५ हजार २८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या १७ जणांसह ४२० व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५२, दोडामार्ग – २०, कणकवली – १२०, कुडाळ – ७५, मालवण – ५०, सावंतवाडी – ३८, वैभववाडी – ५, वेंगुर्ले – ४३. एकूण करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ७२३ झाली आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७२७, दोडामार्ग २०२, कणकवली १०१३, कुडाळ ११८५, मालवण ७२८, सावंतवाडी ५६९, वैभववाडी २६०, वेंगुर्ले ५८८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १७. सक्रिय रुग्णांपैकी २८२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १००५ झाली आहे. आज नोंद झालेल्या ५ मृतांसह इतर १० मृतांचा तपशील असा – देवगड १, दोडामार्ग २, कणकवली ३, कुडाळ ३, मालवण ४, सावंतवाडी १, वैभववाडी १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३१, दोडामार्ग – ३१, कणकवली – २०६, कुडाळ – १५२, मालवण – १९४, सावंतवाडी – १४२, वैभववाडी – ६८, वेंगुर्ले – ७५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.
Follow Kokan Media on Social Media

