रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जून) करोनाचे नवे ५०७ रुग्ण आढळले. नवबाधितांची संख्या अजूनही पाचशेच्या वरच आहे. आज १४७ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. करोनाच्या वेगळ्या विषाणूने जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू आज नोंदविला गेला.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २२७, अँटिजेन चाचणी – १६६ (एकूण ३९३). आधी नोंद न झालेल्या ११४ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५०७ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ५९ हजार ५६३ झाली आहे.
जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.३५ टक्के, तर एकूण रुग्णवाढीचा दर १४.७१ टक्के आहे.
आज सहा हजार २०३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज सहा हजार ६९७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ४५ हजार २७४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज १४७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५१ हजार १६२ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८६.१४ टक्के आहे.
जिल्ह्यात आज १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ७०४ झाली आहे. मृत्युदर २.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५५३, खेड १६५, गुहागर १३७, दापोली १४२, चिपळूण ३३४, संगमेश्वर १४८, लांजा ९९, राजापूर १००, मंडणगड २२. इतर जिल्ह्यातील १२. (एकूण १७०४).
करोनाच्या वेगळ्या विषाणूने एका महिलेचा मृत्यू
दरम्यान, करोनाच्या एका वेगळ्या प्रकारच्या विषाणूची बाधा रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ जणांना झाली होती. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यातील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आज दिली. इतर आठ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेले हे रुग्ण आणि मरण पावलेली महिला रुग्ण डेल्टा प्लस या प्रकारामुळे बाधित झाली होती, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत दिली आहे. देशातील डेल्टा प्लस विषाणूचा हा पहिलाच मृत्यू असल्याचेही राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनाला त्याबाबतची माहिती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळेच करोनाचा वेगळ्या प्रकारचा विषाणू एवढाच उल्लेख आपण करत असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट केले. तसेच त्या विषाणूचे नामकरण कोणी करू नये, असेही त्यांनी सांगितले.
Follow Kokan Media on Social Media

