सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ मे) नवे ४७४ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५९९, तर आतापर्यंत एकूण १७ हजार ११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
पुन्हा तपासणी केलेल्या ४ रुग्णांसह आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ४७४ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता २१ हजार ७४३ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३९, दोडामार्ग – २८, कणकवली – ६९, कुडाळ – १२९, मालवण – ४८, सावंतवाडी – ९२, वैभववाडी – २७, वेंगुर्ले – ३६, जिल्ह्याबाहेरील २.
सध्या जिल्ह्यात ४ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४९९, दोडामार्ग २९१, कणकवली ५६७, कुडाळ ७८४, मालवण ६४६, वैभववाडी ११४, वेंगुर्ले ५३२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी ३४३ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २९३ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू नोंदविला गेला, तर यापूर्वीच्या १६ मृत्यूंची नोंद आज झाली. (एकूण ३०.) त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५७८ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, दोडामार्ग १, कणकवली ४, कुडाळ २, मालवण १०, सावंतवाडी १, वैभववाडी ३, वेंगुर्ले ७.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ६६, दोडामार्ग – १७, कणकवली – १२४, कुडाळ – ८८, मालवण – ९०, सावंतवाडी – ९८, वैभववाडी – ४३, वेंगुर्ले – ५०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
