दापोली : ज्या मुलाला ऐकू येत नाही, जे मूल बोलू शकत नाही, अशा मुलांसाठी येथील कर्णबधिर विद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.
स्नेहदीप संचालित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात ४ ते १४ वयोगटातील कोणत्याही जातीधर्मातील मुलामुलींना प्रवेश दिला जातो. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, शिक्षण आणि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. व्यवसायाच्या प्राथमिक शिक्षणात हस्तकला, शिवणकाम, ऑफिस फाइल बनवणे, लिक्विड सोप, फिनेल, ग्रीटिंग्ज, राख्या, मणीकाम, स्प्रे सेंट, मेणबत्ती, अगरबत्ती, पापड इत्यादी वस्तू तयार करणे इत्यादींचा समावेश आहे. तसेच १ ते ३ वयोगटातील कर्णबधिर बालकांसाठी शीघ्र निदान आणि उपचार केंद्रही सुरू करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी इंदिराबाई बडे कर्णबधिर विद्यालय, शिवाजीनगर, दापोली येथे संस्थेच्या अध्यक्षा सौ. अधिकारी (9421228626), सेक्रेटरी दिनेश जैन (9422382620), मुख्याध्यापिका सौ. मादुस्कर (9421138669), श्री. बलाढ्ये (8446241973) किंवा कार्यालयाशी (9788596061) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

