पितृपक्षानिमित्ताने दिविजा वृद्धाश्रमाला मदत करण्याचे आवाहन

कणकवली : पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी अनेकजण भरपूर पैसे खर्च करतात. ते करत असतानाच असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमातील वृद्धांना पितृजनांची आठवण म्हणून मदत करून पितृपक्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाने केले आहे.

गणेशोत्सव झाला की पितृपक्षातील सर्व विधी आटोपून मुंबईस्थित चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतात. पितृपक्षात परंपरा आणि संस्कृतीनुसार आपल्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान तसेच विविध स्वरूपाचे दान केले जाते. प्रिय जनांच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता पितृपक्षात अन्नदान करून त्यांचे स्मरण केले जाते. याच काळात दिविजा वृद्धाश्रमातील आजी आणि आजोबांना एक दिवसाचे अन्नदान करून नव्या पद्धतीने पितृपक्ष साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सेवेने गरजवंत आजी-आजोबांना एक दिवसाचे भोजन लाभणार आहे. दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे अनेक आशीर्वादही मिळणार आहेत.

इच्छुकांसाठी बँकेचा तपशील देण्यात आला आहे. तो असा –

स्वस्तिक फाउंडेशन
खाते क्र.: 62483160440
स्टेट बँक ऑफ इंडिया,
प्रभादेवी, मुंबई शाखा
IFSC – SBIN0015445

अधिक माहितीसाठी संदेश शेट्ये (9223221400) किंव दीपिका रांबाडे (8530700102) यांच्याशी संपर्क साधता येईल. मदत बँकेत जमा केल्यानंतरही याच क्रमांकावर कळवावे, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply