रत्नागिरीत नवे ४४ नवे रुग्ण; ६६ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २६ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ६६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे ४४ करोनाबाधित आढळले.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार ६०६ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.९९ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ४४ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६७७ पैकी ६५९ अहवाल निगेटिव्ह, तर १८ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १७८३ नमुन्यांपैकी १७५७ अहवाल निगेटिव्ह, तर २६ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ८७७ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ४६ हजार ९५३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ७०३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४६०, तर लक्षणे असलेले २४३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४१८ आहे, तर २८५ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४२, डीसीएचसीमधील ९७, तर डीसीएचमध्ये १४६ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५६ जण ऑक्सिजनवर, २४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.०५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२८ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४१७ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२१, गुहागर १६७, चिपळूण ४७३, संगमेश्वर २१०, रत्नागिरी ८०५, लांजा १२४, राजापूर १६०. (एकूण २४१७).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply