coronavirus

सिंधुदुर्गात २० जण करोनामुक्त; ५१ नवे रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ५१ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर २० जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत कुडाळ तालुक्यातील दोघा करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज दुबार लॅब तपासणीच्या एका रुग्णासह नवे ५१ करोनाबाधित आढळले, तर २० रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ७५० झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग १, कणकवली १५, कुडाळ १५, मालवण ११, सावंतवाडी ३, वैभववाडी ३, वेंगुर्ले २. जिल्ह्यात सध्या ११३६ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ३५ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १२४, दोडामार्ग ४६, कणकवली २१४, कुडाळ २५०, मालवण २११, सावंतवाडी १५१, वैभववाडी ४१, वेंगुर्ले ८८, जिल्ह्याबाहेरील ९.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ओरोस आणि पिंगुळी (ता. कुडाळ) येथील प्रत्येकी एका पुरुष करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३९७ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७४, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८९, कुडाळ – २३१, मालवण – २७७, सावंतवाडी – १९१, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply