Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे करोनाबाधित; १० जण करोनामुक्त

Photo by cottonbro on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे ७ नवे रुग्ण आढळले, तर १० जण करोनामुक्त झाले. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यात सध्या ११७ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी १३ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९, दोडामार्ग ८, कणकवली ४१, कुडाळ २६, मालवण १०, सावंतवाडी १४, वैभववाडी ०, वेंगुर्ले ८, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५५ एवढी आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७९, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९७, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version