pexels-photo-4031867.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ नवे करोनाबाधित; १३ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले, तर १३ जण करोनामुक्त झाले. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यात सध्या ११९ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग १२, कणकवली ४३, कुडाळ १६, मालवण ११, सावंतवाडी १६, वैभववाडी ३, वेंगुर्ले १०, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५६ एवढी आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७९, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply