प्रदेश भाजपाच्या निबंध स्पर्धेत नाशिकचे वैभव अलई विजेते

मुंबई : भारतीय जनता पार्टी प्रदेश माध्यम विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत नाशिक येथील वैभव अलई यांचा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षांत देशाने काय कमावले? काय करायचे बाकी आहे?’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.

भाजपा प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही श्री.भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा – प्रथम क्रमांक – वैभव अनिल अलई, (नाशिक), द्वितीय क्रमांक – वर्षा आबासाहेब अहिरराव,(जळगाव) तृतीय क्रमांक (विभागून ) मानसी मंगेश सावर्डेकर ( ठाणे) आणि प्रज्ञा दर्भे, (बोरिवली).

प्रतिभा पोतदार, सुनील नातू, महेंद्र गेल्ये, कविता अरुण हिरे, आकाश गोवरे, मोहन अत्रे, शैलजा मधुकर रानडे, सागर आव्हारे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली आहेत, अशी माहितीही श्री. भांडारी यांनी दिली आहे.

ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली होती. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पंचाहत्तर हजार, पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply