सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना नवबाधितांच्या संख्येत घट, चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १२७ रुग्ण आढळले. कालच्या तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली, मात्र आज चौघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. २४ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ११५ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या १२ जणांसह एकूण १२७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,५४१ रुग्णांपैकी २७ रुग्ण ऑक्सिजनवर असून ५ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ९८ रुग्ण बाधित आढळले, तर ५३ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४७९ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ८, दोडामार्ग १७, कणकवली २१, कुडाळ १६, मालवण १०, सावंतवाडी ३६, वैभववाडी ८, वेंगुर्ले ६, जिल्ह्याबाहेरील ५.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९३, दोडामार्ग १५२, कणकवली २१७, कुडाळ ४०८, मालवण १२७, सावंतवाडी ३००, वैभववाडी ७५, वेंगुर्ले १५१, जिल्ह्याबाहेरील १८.

आज ज्या चौघांचा मृत्यू नोंदविला गेला, त्यांचा तपशील असा – कुर्ली (ता. वैभववाडी) येथील ६५ वर्षीय पुरुष (हृदयरोग, उच्च रक्तदाब), अणाव (ता. कुडाळ) येथील ८६ वर्षीय पुरुष (हृदयरोग, उच्च रक्तदाब), खासकीलवाडा (सावंतवाडी) येथील ८७ वर्षीय पुरुष (हृदयरोग, उच्च रक्तदाब) आणि धामापूर (ता. मालवण) येथील ७८ वर्षीय पुरुष ( उच्च रक्तदाब). या चौघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४७९ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०२, कुडाळ – २४७, मालवण – २९२, सावंतवाडी – २०८, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply