रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २३ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांमध्ये चांगलीच घट नोंदविली गेली. काल नवे २२२ रुग्ण आढळले होते, आज १५५ नवे रुग्ण आढळले. आज २४५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,१८५ झाली आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८२ हजार ७५६ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७८ हजार ९७५ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.४३ झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ८३० पैकी ७२९ निगेटिव्ह, तर १०१ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ७८३ पैकी ७२९ नमुने निगेटिव्ह, तर ५४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ९२ हजार ७८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,१८५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ९३१, तर लक्षणे असलेले २५४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८८४ असून, संस्थात्मक विलगीकरणात३०१ जण आहेत. एकूण ९५ रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ११४, तर डीसीएचमध्ये १४० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ४७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ५ रुग्ण दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५०१ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०२ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७५, चिपळूण ४८२, संगमेश्वर २२५, रत्नागिरी ८३२, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५०१).
लसीकरणाची स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५४ सत्रे पार पडली. त्यात ४३५ जणांनी लशीचा पहिला, तर १,५६९ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २,००४ जणांचे लसीकरण झाले. २२ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४५ हजार ४८३ जणांचा पहिला, तर ८ लाख ६ हजार ९३२ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामध्ये १५ ते १७ वयोगटातील ३३१, तर बूस्टर डोस घेतलेल्या २२८ जणांचा समावेश आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media