pexels-photo-4031867.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांपेक्षा संख्येत किंचित वाढ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १९१ रुग्ण आढळले. कालच्या (१७६) तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. आज ९७ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात देण्यात आली आहे.

आज (दि. २३ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात १८७ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ४ जणांसह एकूण १९१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,४२७ रुग्णांपैकी २४ रुग्ण ऑक्सिजनवर असून ७ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९७१ रुग्ण बाधित आढळले, तर ५३ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४७५ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २०, दोडामार्ग १६, कणकवली १४, कुडाळ ४७, मालवण ४, सावंतवाडी ४३, वैभववाडी १२, वेंगुर्ले ३१, जिल्ह्याबाहेरील ४.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ८५, दोडामार्ग १३५, कणकवली १९६, कुडाळ ४००, मालवण १२०, सावंतवाडी २६५, वैभववाडी ६८, वेंगुर्ले १४५, जिल्ह्याबाहेरील १३.

रेवतळे (ता. मालवण) एका ४० वर्षीय पुरुष रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज नोंद झाली. या रुग्णाला फुफ्फुसविकार होता. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४७५ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०२, कुडाळ – २४६, मालवण – २९१, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply