dispenser with soap and corona word

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २४ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांमध्ये कालच्या तुलनेत आजही घट नोंदविली गेली. काल नवे १५५ रुग्ण आढळले होते, आज १४६ नवे रुग्ण आढळले. आज २१५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,१९७ झाली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८२ हजार ९०२ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७९ हजार १९० आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.५२ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७४२ पैकी ६४३ निगेटिव्ह, तर ९९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४४२ पैकी ३९५ नमुने निगेटिव्ह, तर ४७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ९३ हजार ११६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,१९७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ९३२, तर लक्षणे असलेले २६५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८८२ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३१५ जण आहेत. एकूण १३ रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १२१, तर डीसीएचमध्ये १४४ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ५० रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ६ रुग्ण दाखल आहेत.

आज गुहागर तालुक्यातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५०२ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.०८ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०२ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७६, चिपळूण ४८२, संगमेश्वर २२५, रत्नागिरी ८३२, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५०१).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात २३ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची २ सत्रे पार पडली. त्यात २ जणांनी लशीचा पहिला, तर १२ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १४ जणांचे लसीकरण झाले. २३ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४५ हजार ५०४ जणांचा पहिला, तर ८ लाख ७ हजार १५० जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply