फास्ट फूड पदार्थ बनविण्याचे रत्नागिरीत मोफत प्रशिक्षण

रत्नागिरी : स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेने फास्ट फूड पदार्थ बनविण्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे. येत्या १० ते १९ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या कालावधीत हे प्रशिक्षण दररोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. यात एकूण ३५ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात भेळ, शेवबटाटापुरी, दहीपुरी, पाणीपुरी, दाबेली, सामोसा, पावभाजी, इडली सांबार, मेदूवडा, उत्तपा, डोसा, मोमोज, गोबी मांच्युरियन, सँडविच, व्हेज सूप, नूडल्स, व्हेज फ्राइड राइस आदी पदार्थ शिकविले जाणार आहेत. हे प्रशिक्षण मोफत असून चहा, नाष्टा, जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ४५ वयोगटातील रत्नागिरी जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य अर्ज करू शकतात.

अर्ज भरणासाठी येताना पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान यांच्यामार्फत देण्यात येणारे शिफारसपत्र, दारिद्र्यरेषेखाली नाव असल्याचा दाखला कार्यालयीन वेळेत घेऊन जावे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना फोनद्वारे संपर्क करण्यात येईल. प्रशिक्षणाचा आणि अर्ज भरण्याचा पत्ता असा – स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साईनगर, आरटीओ रोड, कुवारबाव, रत्नागिरी.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply