pexels-photo-4031867.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या परिस्थितीत सुधारणा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या परिस्थितीत आशादायक सुधारणा दिसू लागली आहे. आज (दि. ३१ जानेवारी) नवे ५७ रुग्ण आढळले, तर १३१ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८३ हजार ७७५ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजार ३२० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.८८ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३०२ पैकी २६२ निगेटिव्ह, तर ४० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या २२९ पैकी २१२ नमुने निगेटिव्ह, तर १७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १ हजार ७८६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८९५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ६२०, तर लक्षणे असलेले २७५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५५१ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३४४ जण आहेत. एकूण ४७ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १४२, तर डीसीएचमध्ये १३३ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ६९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी २६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात १२ रुग्ण दाखल आहेत.

यापूर्वी खेड तालुक्यात मरण पावलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५१३ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ०.५८ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. यापूर्वीचा मृत्यू आज नोंदविला गेल्याने आजचा मृत्युदर ० टक्के दर्शविण्यात आला आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १७७, चिपळूण ४८७, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३४, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५१३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply