रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची संख्या ८० हजारावर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३० जानेवारी) २३४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची संख्या ८० हजारावर गेली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८३ हजार ७१८ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजार १८९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.७८ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३९४ पैकी ३३९ निगेटिव्ह, तर ५५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ८९० पैकी ८४९ नमुने निगेटिव्ह, तर ४१ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १ हजार ३१२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९१० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ६३२, तर लक्षणे असलेले २७८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५६८ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३४२ जण आहेत. एकूण १०७ रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १४०, तर डीसीएचमध्ये १३८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ६४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी २६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात १२ रुग्ण दाखल आहेत.

चिपळूण तालुक्यात यापूर्वी मरण पावलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५१२ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ०.५८ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.५८ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७७, चिपळूण ४८७, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३४, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५१२).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात २९ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ४६ सत्रे पार पडली. त्यात २२७ जणांनी लशीचा पहिला, तर ७८४ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १,०११ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील १५५, तर ३४३ जणांनी बूस्टर डोस घेतले. २९ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४७ हजार ४७२ जणांचा पहिला, तर ८ लाख १८ हजार १२३ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply