सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ९२ रुग्ण, ८६ करोनामुक्त, तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ९२ रुग्ण आढळले, तर ८६ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तिघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात देण्यात आली आहे.

अहवालानुसार आज (दि. ३० जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ८१ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ११ जणांसह एकूण ९२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९७२ रुग्णांपैकी २० रुग्ण ऑक्सिजनवर असून ८ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज ८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ७२१ रुग्ण बाधित आढळले, तर ५४ हजार २५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज तिघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४९४ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग ४, कणकवली १०, कुडाळ १५, मालवण ९, सावंतवाडी ३३, वैभववाडी ४, वेंगुर्ले ७, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९१, दोडामार्ग ४९, कणकवली ९१, कुडाळ २३०, मालवण १०४, सावंतवाडी १९५, वैभववाडी ३९, वेंगुर्ले ११३, जिल्ह्याबाहेरील २१.

आज तेंडोली (ता. वेंगुर्ले) येथील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. फुफ्फुसविकार असलेल्या या पुरुष रुग्णाचे वय ७८ वर्षे होते. याशिवाय आधी मरण पावलेल्या कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंदही आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४९४ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८२, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०७, कुडाळ – २४९, मालवण – २९५, सावंतवाडी – २११, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply