coronavirus

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे रुग्ण पुन्हा शंभरावर, चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १२८ रुग्ण आढळले, तर १४६ रुग्ण करोनामुक्त झाले. आज चौघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. २९ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात १२० तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ८ जणांसह एकूण १२८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९६९ रुग्णांपैकी २२ रुग्ण ऑक्सिजनवर असून ९ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज १४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ६२९ रुग्ण बाधित आढळले, तर ५४ हजार १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज चौघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४९१ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २४, दोडामार्ग ८, कणकवली ८, कुडाळ २८, मालवण १५, सावंतवाडी २४, वैभववाडी ४, वेंगुर्ले १६, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ८४, दोडामार्ग ६८, कणकवली ८२, कुडाळ २१९, मालवण १००, सावंतवाडी १९९, वैभववाडी ४२, वेंगुर्ले १५६, जिल्ह्याबाहेरील १९.

आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – कातवड (ता. मालवण) येथील ६५ वर्षीय पुरुष (उच्च रक्तदाब), गवंडीवाडा (मालवण) येथील ५८ वर्षीय पुरुष (उच्च रक्तदाब, हृदयरोग), सांगवे (ता. कणकवली) ६५ वर्षीय पुरुष (हृदयरोग), दारूम (ता. कणकवली) ४५ वर्षीय स्त्री, (मूत्रपिंड विकार).
या चौघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४९१ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८२, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०६, कुडाळ – २४९, मालवण – २९५, सावंतवाडी – २१०, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply