स्पर्धापरीक्षांसाठी राज्यशास्त्र विषयावर फेसबुक लाइव्हवर मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित केली जातात. या उपक्रमाअंतर्गत येत्या बुधवारी (दि. २ फेब्रुवारी) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत राज्यशास्त्र या विषयाची तयारी कशी करावी, अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, याविषयी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्याकरिता https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 या लिंकवरून सहभागी होता येणार आहे. परीक्षेच्या स्वरूपापासून विविध शंकांचे निरसन यावेळी केले जाणार आहे.

याबाबत कोणतीही शंका, प्रश्न असल्यास सहभागी विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकतील. परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई आणि परिवीक्षाधीन तहसीलदार संकेत यमगर या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने यूपीएससी आणि एमपीएससीविषयी मार्गदर्शन सत्रे आयोजित केली होती. त्यातील पुढचे सत्र येत्या बुधवारी होणार आहे. स्पर्धा परीक्षेकरिता राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

या मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी सोबतच्या लिंकवर जावे.

https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply