Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दोडामार्ग, कणकवली, वैभववाडीत करोनाचा नवा रुग्ण नाही

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. आज दोडामार्ग, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

आज करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले, तर २७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. १६ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात १२ आणि जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी झालेल्या दोघांसह एकूण १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २३५ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही किंवा चिंताजनक अवस्थेतही नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार २९० रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ५३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५२२ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली ०, कुडाळ २, मालवण २, सावंतवाडी ३, वैभववाडी ०, वेंगुर्ले ६, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ११, दोडामार्ग १६, कणकवली १२, कुडाळ ५९, मालवण ५८, सावंतवाडी २८, वैभववाडी ४, वेंगुर्ले ४१, जिल्ह्याबाहेरील ६.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१८, कुडाळ – २५३, मालवण – २९८, सावंतवाडी – २१५, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version