सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकमेव नवा रुग्ण आढळला. कुडाळ वगळता इतर कोणत्याही तालुक्यात आज नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. २१ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २०० रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही किंवा चिंताजनक अवस्थेतही नाही. आज ५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले.
आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ३१९ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ५९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५२५ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग ०, कणकवली ०, कुडाळ १, मालवण ०, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०, जिल्ह्याबाहेरील ०.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ११, दोडामार्ग ५, कणकवली ९, कुडाळ ६०, मालवण ४६, सावंतवाडी २१, वैभववाडी ४, वेंगुर्ले ३८, जिल्ह्याबाहेरील ६.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१८, कुडाळ – २५४, मालवण – २९९, सावंतवाडी – २१५, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
