सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही, की एकाही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. त्यामुळे आजचा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. १ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ६० जणांचे नमुने तपासण्यात आले. मात्र त्यापैकी एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १३३ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही किंवा चिंताजनक अवस्थेतही नाही. आज एक रुग्ण बरा झाल्याने घरी गेला.
आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ३५७ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ६९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५२७ एवढीच आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग ५, कणकवली ४, कुडाळ ३६, मालवण ५३, सावंतवाडी १३, वैभववाडी १, वेंगुर्ले ११, जिल्ह्याबाहेरील ५.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१९, कुडाळ – २५४, मालवण – २९९, सावंतवाडी – २१६, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड