विज्ञान शिक्षक मंडळाच्या निबंध स्पर्धेत देवरूखच्या मुली प्रथम

देवरूख : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. इंग्रजी आणि मराठी माध्यमातून झालेल्या या स्पर्धेत दोन्ही गटांत देवरूखच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ही निबंध स्पर्धा डी. जी. इनामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी पर्यावरण संरक्षणात माझी भूमिका हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेत मराठी माध्यमातील ५६, तर इंग्रजी माध्यमातील ३२ निबंधांचा समावेश होता, अशी माहिती कार्यवाह प्रभाकर सनगरे यांनी दिली.

स्पर्धेचा गुणानुक्रमे सविस्तर निकाल असा इंग्रजी माध्यम- आयुषी कुरलीकर (पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरूख), अनोमा जाधव (इंग्लिश मीडियम स्कूल, मंडणगड), सानिका खांबल (उत्कर्ष विद्यामंदिर, शिवणे खुर्द), उत्तेजनार्थ- महम्मद शेख (महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई).

मराठी माध्यम- देवीशा आंब्रे (छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर, देवरूख), माही वनकर (मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली), सार्थक चव्हाण (जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श केंद्रशाळा, सांगवे), उत्तेजनार्थ – आर्या पांचाळ (न्यू इंग्लिश स्कूल, वेळणेश्वर).

पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तर उत्तेजनार्थ क्रमांकांना सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाची तारीख आयोजकांकडून नंतर कळवली जाणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष आर. व्ही. जावकर, कार्यवाह प्रभाकर सनगले, तसेच इतर पदाधिकारी व सदस्य यांनी स्पर्धेतील सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply