प्रिंदावण येथे कै. सौ. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन

राजापूर : प्रिंदावण (ता. राजापूर) येथील मानवाडी येथे कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त सिटी सर्व्हे ऑफिसर विष्णु गुणाजी धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हे ग्रंथालय सुरू केले आहे. यावेळी ज्ञानप्रबोधिनी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप घेवडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश धुरी, भीमसेन धुरी, मानवाडी शाळेचे शिक्षक राजेंद्र गावित, दिनेश काळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मानवाडीसारख्या अगदी आडबाजूच्या ग्रामीण भागात गोंडाळ सरांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हे ग्रंथालय सुरू केले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागातील मुलांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर अवांतर पुस्तकवाचनाची आवड लहान वयातच लागावी, या उद्देशाने – त्यांनी “ग्रंथालय आपल्या दारी” आणले आहे. त्याचा लाभ मानवाडीतील मुलांनी आणि ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन उद्घाटक विष्णु धुमाळे व प्रमुख अतिथी संदीप घेवडे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply