राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल ९५ टक्के

देवरूख : आंबव (देवरूख) येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीचा निकाल ९५ टक्के लागला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ वर्षाच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आंबव (देवरूख) येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीमधून परीक्षा दिलेल्या १४५ विद्यार्थांपैकी १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


महाविद्यालयातून कॉम्पुटर इंजिनीरिंग विद्याशाखेकील ५८ पैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाखेचा निकाल ९६.५५ टक्के लागला. ऋतुजा अनिल रपशे ९.३० पॉइंटसह महाविद्यालयात प्रथम, अमेय जाधव ९.१९ पॉइंटसह दुसरा तर शबिब मुकादम ८.९९ पॉइंटसह तिसरा आला आहे.

ऑटोमोबाइल इंजिनीरिंग शाखेचा निकाल ९३.७५ टक्के लागला असून चिन्मय महेश पाध्ये (८.८५ पॉइंट), ऋषिकेश साळवी (८.२५) आदित्य अंकुशराव (८.१६) यांनी महाविद्यालयात पहिले तीन क्रमांक मिळविले.

मेकॅनिकल इंजिनीरिंगमधून ६१ पैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाखेचा निकाल ९३.४४ टक्के लागला. वैभव विलास करवडे (८.७८ पॉइंट), अनिकेत खंदारे (८.७६) आणि शुभम मुळीक (८.४९) यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले.

इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचा निकाल ९० टक्के लागला. रसिका नामदेव खोत (९.२२), गौरी माने (८.३२) आणि अमित राठोड (८.१७) यांनी गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

संस्थाध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी आणि प्राध्यापकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply