सॅटर्डे क्लबच्या शिबिरात १६ उद्योजकांचे रक्तदान

रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा रत्नागिरी चॅप्टर आणि रेड क्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. ११ ऑगस्ट) झालेल्या रक्तदान शिबिरात १६ उद्योजकांनी रक्तदान केले.

उद्योजकांनी आपले व्यवसाय सांभाळत असतानाच समाजाविषयीचे आपले उत्तरदायित्व जोपासले पाहिजे, या हेतूनेच सॅटर्डे क्लबने रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीचा धागा पकडून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात सॅटर्डे क्लबच्या कुडाळ चाप्टरचे सदस्यही सहभागी झाले होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.

मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही सामाजिक संस्था २०१८ पासून रत्नागिरीत काम करत आहे. मराठी उद्योजकांना एकत्र आणताना समाजोपयोगी कार्य करण्याचा रत्नागिरी चाप्टरचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी राम कोळवणकर, तुषार आग्रे, प्रतीक कळंबटे, प्रकाश भुरवणे, सागर वायंगणकर तसेच अन्य सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उद्योजकांनी रत्नागिरी चॅप्टर चेअर पर्सन प्रतीक कळंबटे (9665299329) तसेच सेक्रेटरी प्रकाश भुरवणे (82759 19821) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply