रत्नागिरी : उक्षी गावचे सुपुत्र मिलिंद खानविलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
मिलिंद खानविलकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. उक्षीचे सरपंच म्हणून त्यांनी ५ वर्षे पद भूषवले आहे. सरपंच कार्यकाळात त्यांनी अहोरात्र झटून गावच्या विकासाला हातभार लावला आहे. त्यांच्याच कारकिर्दीत उक्षी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या ते उक्षी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आहेत. करोना काळात श्री. खानविलकर यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पदरमोड करून त्यांनी लोकांना आर्थिक सहकार्य केले आहे. आज पंचक्रोशीत मिलिंद खानविलकर यांचे नाव सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन पालकमंत्री उदय यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८ च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते उक्षी येथे झाले होते. कातळशिल्पांसाठी उक्षी गाव प्रसिद्ध आहे. त्याच विषयावरचा हा दिवाळी विशेषांक होता. त्यातील लेख आणि श्री. खानविलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाशन समारंभाचा व्हिडीओ सोबतच्या लिंकवर –

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

