कोकणातील कातळशिल्पांच्या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोकणातील कातळशिल्पांच्या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे.
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.
लांजा : झाशीच्या राणीचे सासर असलेल्या कोट (ता. लांजा) गावात माचपठार कातळसड्यावर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह प्रकाशात आला आहे.
मुंबई : जागतिक वारसा दिनी (१८ एप्रिल) कोकणवासीयांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कोकणातील सुमारे १० हजार वर्षांपूर्वीचा वारसा असलेली कातळशिल्पे आणि छत्रपती शिवरायांनी बांधलेले सागरी व डोंगरी किल्ले यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत (ASI) सादर केलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्त्वत: स्वीकार करण्यात आला आहे.
रत्नागिरी : कोकणाचे वैशिष्ट्य आणि आगळावेगळा वारसा ठरलेल्या कातळशिल्पांचा महोत्सव भरविण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेच्या गेल्या काही वर्षांपासून कातळशिल्पांचा शोध आणि जतन करण्याच्या चळवळीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पाठिंबा मिळाल्यामुळे महोत्सवाला चालना मिळाली आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे येत्या डिसेंबरमध्ये कोकणातील पुरातन ठेवा असलेली कातळ-खोद-चित्रे पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.