लांज्याच्या महिलाश्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप

लांजा : येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती प्रियंका रसाळ यांनी माजी विद्यार्थ्यांसह लांजा महिलाश्रमातील गुणवंत मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

इंग्रजी विषयाच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका तसेच माजी विद्यार्थी असोसिएशनच्या संचालिका असलेल्या श्रीमती प्रियंका रसाळ गेली सहा वर्षे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महिलाश्रमातील निराधार, गरजू मुलांना भेट देऊन त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. याहीवर्षी समाजभान जपणारी परंपरा त्यांनी कायम राखली. यंदा विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगीत खडू, वह्या, पट्टी, पेन्सिल, पेन, खोडरबर आदी शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच आश्रमातील वृद्ध महिलांनाही शाल आणि अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

त्यानिमित्ताने पार पडलेल्या छोटेखानी समारंभाच्या व्यासपीठावर रूपेश सुर्वे, प्रियंका रसाळ, अनुजा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांनी वह्या आणि खाऊ मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला.

समाजातील निराधार गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात श्रीमती रसाळ यांचे आजी-माजी विद्यार्थी सहभाग घेऊन आपल्या परीने मदत करतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी आणि समाजपयोगी उपक्रमात त्यांनी पुढाकार घ्यावा, हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जान्हवी यादव, साक्षी पवार आणि रोहन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रज्ञा पालकर हिने गीतगायन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply