Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांची हॉटेल विवेकला भेट

Advertisements

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारामधील कौशल्य विकास केंद्रातील ६० विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील माळ नाका येथील प्रसिद्ध हॉटेल विवेकला औद्योगिक भेट दिली.

या भेटीमध्ये कौशल्य विकास केंद्रातील फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस असोसिएट, कॉमिस शेफ, असिस्टंट शेफ, हाऊस कीपिंग सुपरवायझर या बॅचमधील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष कामकाज कसे चालते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्व विभाग दाखवून विस्तृत महिती दिली. हॉटेल विवेकच्या प्रत्येक विभागाच्या स्टाफने रिसेप्शन, फ्रंट ऑफिस, रेस्टॉरंट, बॅक सर्व्हिस या विभागांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालते, याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह महिती दिली.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यक्त करताना या भेटीमध्ये या क्षेत्रातील नवनवीन माहिती अनुभवायला मिळाल्याबद्दल हॉटेल विवेक व कौशल्य विकास केंद्राचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी हॉटेल विवेकचे मालक विक्रांत देसाई, विशाल देसाई, विनय देसाई यांनी विशेष सहकार्य केले. कौशल्य विकास केंद्राचे प्रशासक महेश बेडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना या भेटीमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधींची माहिती होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी कौशल्य विकास केंद्राचे शिक्षक अमेय मुळ्ये, ऋषिकेश मेहेंदळे, रुत्वेज शिरधनकर, श्रीनिवास माने, अमित धाटावकर, सौ. अमृता साळवी, कर्मचारी रियाझ सावकार आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version