नवी मुंबई : वाशी (नवी मुंबई) येथील सिडको कन्वेन्शन सेंटरमध्ये येत्या १२ आणि १३ एप्रिल रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाचा मुंबई विभाग आणि नवी मुंबईतील ब्रॅण्ड कनेक्ट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार आणि गुरुवारी (दि. १२ आणि १३ एप्रिल) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत बेरोजगार उमेदवारांसाठी हे मेळावा आयोजित केल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपआयुक्त शा. गि. पवार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार असून दहावी पास-नापास, बारावी, आयटीआय, पदवी, पदविका, पदवीधर, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार मागणीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. स्वतःचा बायोडाटा आणि शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांसह मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. अधिकाधिक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

