रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत हॉस्पिटॅलिटी कार्यशाळेचा लाभ अनेक महिलांनी घेतला.

ही कार्यशाळा स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंट, होम स्टे यांच्या सध्या कार्यरत असणाऱ्या कुशल व अकुशल महिला कर्मचाऱ्यांसाठी होती. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनेस्ट ग्रुप ऑफ हॉटेल्सचे फाउंडर अँड पार्टनर मिथिल पित्रे आणि रत्नागिरीतील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हच्या प्रोप्रायटर सौ. ममता नलावडे उपस्थिती होत्या. कस्टमर सर्व्हिस या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. पित्रे यांनी सेवा उत्तम करण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये, कस्टमर इंटरॅक्शन तसेच हॉटेल इंडस्ट्रीमधील विविध अनुभव प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडले. हाउसकीपिंगमधील विविध जॉब रोल्स, जबाबदाऱ्या, करियर संधी, सौ. ममता नलावडे मॅडम यांनी मांडल्या. फ्रंट ऑफिस अँड बिझिनेस कम्युनिकेशन या विषयावर मार्गदर्शन करताना फ्रंट ऑफिससाठी आवश्यक असणारे कौशल्य, ग्रूमिंग, विविध करियर संधी प्रा. सोनिया मापुसकर यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केल्या.
प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभागी महिलांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
सूत्रसंचालन सौ. सिद्धी सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, समारोप आणि आभार प्रकल्प समन्वयकस्वप्नील सावंत यांनी केले.
कार्यक्रमासाठी रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड, देवरूख, गुहागर येथील विविध हॉस्पिटॅलिटी स्टाफची उपस्थिती लाभली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

