Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

महिला दिनानिमित्त साजरा झाला तिचा दिवस

Advertisements

रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका संस्था रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे महिला दिनानिमित्त तिचा दिवस उत्साहात साजरा झाला.

विविध गुणदर्शन आणि रजोनिवृत्ती समस्या की एक टप्पा, या विषयावर चर्चा असा दोन सत्रात हा कार्यक्रम रविवारी, दि. १० मार्च रोजी पार पडला. आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या जिल्हाध्यक्ष सौ. सुनेत्रा जोशी आणि प्रमुख अतिथी सौ. साधना ओगले यांनी दीपप्रज्वलन आणि सरस्वतीला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता कोकजे यांनी उत्तम रीतीने केले. प्रस्तावना सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी केली, तर मनोगत अध्यक्ष सौ. सुनेत्रा विजय जोशी यांनी केले. साहित्यात यशस्वी होण्यासाठी म्हणजेच ते साध्य करण्याची त्रिसूत्री सांगताना सराव, सातत्य आणि संयम आवश्यक आहे, असे सौ. जोशी यांनी सांगितले.

विविध गुणदर्शन कार्यक्रमात सुरुवातीला वसुंधरा गोखले यांनी देवीचा जोगवा सादर केला, तर लता जोशी यांनी लाडीगोडी हे स्फुटलेखन सादर केले. कुंदा बापट, शर्वरी जोशी, स्नेहल तुळसणकर, मेघना मराठे, अनुप्रीता कोकजे यांनी बहारदार अशा तिच्या कविता सादर केल्या, तर अनुराधा दीक्षित यांनी मालवणी कविता सादर करून त्यात रंग भरला. सरिता गोखले आणि विशाखा पाटोळे यांनी त्यांच्या गझल सादर करून त्यात भर घातली. उमा जोशींचा आलवणातली बाई हा लेख अंतर्मुख करून गेला. अनुराधा आपटेंनी फसलेल्या पदार्थाची कहाणी छान जमवली. मनीषा शितूत यांनी नटसम्राटचा एकपात्री प्रयोग करून कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. सुनेत्रा जोशींनी गझल, तर साधना ओगले यांनी कविता सादर केली.

दुस-या सत्रात रजोनिवृत्ती समस्या की आयुष्यातील एक टप्पा… यावर चर्चा झाली. डॉ. मंजिरी जोग यांनी या विषयावरच्या भाषणात रजोनिवृत्तीच्या काळातले त्रास आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार याबद्दल माहिती दिली. तसेच शंका समाधान केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version