रत्नागिरी : महिला दिनानिमित्त आम्ही सिद्ध लेखिकां`नी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरीच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
यावेळी आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख सौ. सुनेत्रा जोशी, कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुळकर्णी, कोमसाप केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर, रत्नागिरी शाखा अध्यक्षा सौ. तेजा मुळ्ये आणि प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अक्षता सप्रे उपस्थित होत्या. डॉ. सप्रे यांनी महिलांचे आरोग्य याविषयी ओघवत्या वाणीमध्ये बहुमूल्य मार्गदर्शन केले. ज्येष्ठ साहित्यिका सौ. लता जोशी आणि दोन्ही संस्थांच्या सभासद सौ. आकांक्षा भुर्के यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिता कीर यांचा सत्कार सौ. सुनेत्रा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
समारंभात काव्यवाचनाचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यामधे सौ. आकांक्षा भुर्के, सौ. राधिका आठल्ये, सौ. शमा प्रभुदेसाई, सौ. अनुराधा दीक्षित, सौ. लता जोशी, सौ. अर्चना देवधर, सौ. सरिता प्रशांत गोखले, कुंदा भालचंद्र बापट, अनुप्रीता कोकजे आणि सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी विविध शैलीतल्या, वेगवेगळे विचार व्यक्त करणाऱ्या, हृदयस्पर्शी गझल व कविता सादर केल्या. कार्यक्रमाला कोमसापचे उपाध्यक्ष दादा कदम तसेच डॉ. विजय जोशी उपस्थित होते.
सौ. नमिता कीर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आकांक्षा भुर्के यांनी केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

