रत्नागिरी : मनस्पर्शी साहित्य परिवाराने व्हॉट्स अॅप ग्रुप लेखन स्पर्धा जाहीर केली आहे. त्यामध्ये साप्ताहिक आणि मासिक लेखन स्पर्धेत सहभाग घेता येईल.
हा उपक्रम व्हॉट्स ॲप समूह असलेल्या मनस्पर्शी साहित्य परिवार या समूहात घेतला जाईल. या उपक्रमाचा साहित्यिकांच्या लेखणीला लिहिते करणे अथवा सोबतच त्यांचे लिखाण अविरतपणे चालू राहावे. हा प्रामाणिक उद्देश आहे.
याअंतर्गत साप्ताहिक उपक्रम अथवा मासिक उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर नाव नोंदणी करावी. सदरील उपक्रम हा एक वर्ष चालेल. या एक वर्षात लिहिलेल्या साहित्याचे परीक्षण करून वर्षाच्या शेवटी त्याचे नियमावलीनुसार क्रमांक काढले जातील. यामध्ये वेळेवर पोस्ट करता का, उपक्रमात वेगवेगळे विषय हाताळले जातात का, लिहिलेल्या लिखाणात आशयघनता, शुद्धलेखन, व्याकरण, वाक्यरचना तपासून पोस्ट केली जाते का, अशा विविध गोष्टींचा परामर्श घेऊन निकाल काढले जातील.
या उपक्रमात साप्ताहिक किंवा मासिक यापैकी एका किंवा दोन्ही उपक्रमात एकाच वेळी सहभागी होता येईल. त्याकरिता वर्षभर लिहीत असणाऱ्या उपक्रमाला एक ठराविक शीर्षक द्यायचे आहे. भावनांचा कल्लोळ असे शीर्षक दिले असेल, तर आपल्या मनात चालत असलेल्या, समाजात चालत असलेल्या अथवा घडत असलेल्या घटनांवर विविध प्रकारे विषय मांडणी करून आपले काव्य लेखन अथवा गद्य लेखन लिहायचे आहे. मासिक उपक्रमात लिहायचे असेल तर केवळ बारा रचना लिहाव्या लागतील. साप्ताहिक उपक्रमात भाग घेतला तर दिलेल्या शीर्षकांतर्गत एकूण ५२ रचना गद्य अथवा पद्य लिहाव्या लागतील. लिखाण शीर्षकाला समर्पक असणे आवश्यक आहे. मासिक उपक्रमात सहभाग घेतल्यास १ ते ३० तारखेच्या दरम्यानची एक तारीख निश्चित करावी. साप्ताहिक उपक्रमाकरिता कोणताही एक वार निश्चित करावा. उपक्रमात सातत्य आणि नियमितता असणे आवश्यक आहे.
गद्य विभागातील कथा, लेख, ललित लेख किंवा पत्र लिखाण किमान ५०० ते जास्तीत जास्त हजार शब्दांपर्यंत, तर पद्य विभागात कविता या प्रकाराला ओळींचे बंधन नसले तरी ती जास्त लांबलचक नसावी आणि उत्तम आशय कवितेतून व्यक्त व्हायला हवा. कविता व्याकरण मान्य कोणत्याही काव्य प्रकारात असावी.
नावनोंदणी २५ जून २०२४ सकाळी ७ पासून ते २० जुलै रात्री १२ च्या आत करावी. नाव नोंदणीसाठी क्रमांक असे : महिलांसाठी – सौ.संपदा राजेश देशपांडे – 7208426140; पुरुषांसाठी – राजेश नागुलवार – 91752 29509.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड






