रत्नागिरी : साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ तर्फे यावर्षीच्या दीपोत्सवानिमित्ताने अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धा आयोजित केली आहे. इम्युनिटी हा या कथा स्पर्धेचा विषय आहे.
साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ रत्नागिरीतून गेली पाच वर्षे प्रसिद्ध होत आहे. कोकणातील विविध विषय त्यामध्ये हाताळले जातात. साप्ताहिकाच्या दिवाळी अंकांनी कोकणासह मुंबई-पुण्यात मानाचे स्थान मिळविले आहे. मुंबईतील महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघ, मुंबई वृत्तपत्र लेखक संघ अशा संस्थांनी अंकाची दखल घेतली आणि उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार देऊन गौरव केला.
करोनाच्या जागतिक महामारीने इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती या विषयाची मोठी चर्चा होत आहे. याच विषयावरचा विशेषांक यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने ‘कोकण मीडिया’तर्फे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. माणसाची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, करोना किंवा त्यासारख्या साथी आणि आजारांना तोंड द्यायचे असेल, तर चांगल्या रोगप्रतिकारशक्तीला पर्याय नाही, हे जगाने मान्य केले आहे. हीच इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती ही मध्यवर्ती कल्पना घेऊन अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठीसह कोकणातील बोलीभाषांमध्ये लिहिलेली कथाही स्पर्धेकरिता स्वीकारली जाईल.
स्पर्धेसाठी कथा एक हजार शब्दांपर्यंतची आणि स्वतः लिहिलेली असावी. अनुवादित कथा पाठवू नये. यशस्वी स्पर्धकांना तसेच उत्तेजनार्थ लेखन करणाऱ्या कथाकारांना रोख बक्षिसे दिली जातील.
या कथा स्पर्धेव्यतिरिक्त अन्य विषयांवरील कथा, कविता, लेख, व्यंगचित्रेही दिवाळी अंकासाठी अवश्य पाठवावीत.
स्पर्धेच्या कथा तसेच इतर साहित्य पाठविण्याची अंतिम मुदत : 30 सप्टेंबर 2021
सर्व साहित्य टपाल किंवा ई-मेलने पाठवावे.
*पत्ता :
साप्ताहिक कोकण मीडिया,
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस
कुसुमसुधा, 697, रामचंद्रनगर (श्रीनगर),
गांधी ऑटोमोबाइल्सच्या मागे,
खेडशी, रत्नागिरी-415639
संपर्क : (व्हॉट्स अॅप) 9422382621
ईमेल : kokanmedia@kokanmedia.in
वेबसाइट : http://www.kokanmedia.in
फेसबुक : http://www.facebook.com/kokanmedia
ट्विटर : https://twitter.com/kokanmedia
यूट्यूब : kokanmediaRatnagiri
टेलिग्राम : https://t.me/kokanmedia

