Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या टीशर्टचे अनावरण

Advertisements

रत्नागिरी : येत्या ५ जानेवारी रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाच्या टी शर्टचे अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

कोकणची जैवविधता दर्शविलेल्या टीशर्ट चे अनावरण करताना उत्स्फूर्तपणे “अहाहा सुंदर… कोकण कोस्टल मॅरेथॉन म्हणजे दर्जा,….” असे उदगार त्यांच्या तोंडून बाहेर पडले.

सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोकणवासीय आयोजित करत असलेल्या या मॅरेथॉनसाठी कुठल्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधिताना दिले. तसेच जास्तीत जास्त कोकणवासीयांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.

यावेळी राहुल पंडित, बाबू म्हाप, टीम कोकण कोस्टलचे सुहास ठाकूरदेसाई , महेश सावंत, योगेश मोरे, निलेश शाह, कांचन चांदोरकर, प्रसाद देवस्थळी, सारंग ओक उपस्थित होते.

अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या या मॅरेथॉनसाठी जवळपास ७० हून अधिक शहरांमधून फिटनेस प्रेमी येत आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणेच रत्नागिरी शहरातील जास्तीत जास्त हॉटेल फिटनेस टुरिस्टकडून बुक झाली आहेत आणि त्यामुळे हॉटेल तसेच रेस्टॉरेंट चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन या उपक्रमांचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.

कोकणातील जैवविविधता मॅरेथॉनच्या माध्यमातून जागतिक पटलावर पोचविण्यासाठी कोकणवासीय करत असलेल्या या प्रयत्नांची दखल राज्य पर्यटन संचालनालयानेदेखील घेतली आहेय या उपक्रमाचे पर्यटन संचालनालय प्रेझेंटेड बाय पार्टनर आहेत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तसेच नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप, भाट्ये गावांमधील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ रुट सपोर्ट करणार आहेत.

मेनेकी अॅबसॉल्यूट या उपक्रमाचे एनर्जी पार्टनर असून, बँक ऑफ इंडिया असोसिएट पार्टनर आहेत. अनबॉक्स या उपक्रमाचे H२O पार्टनर आहेत, जोशी फूड्सकडून सर्व सहभागी फिनिशर्स ना उकडीचे मोदक दिले जाणार आहेत. सुरस स्नॅक्स सेंटर हे बीब कलेक्शन दरम्यान फूड पार्टनरचे काम करणार आहेत. मागील वर्षीप्रमाणे फिटनेस मंत्रा च्या अंकिता पाटकर आणि त्यांची संपूर्ण टीम झुंबा सेशन घेणार असून, पितांबरी क्युअर ऑन ऑइलच्या माध्यमातून जगप्रसिद्ध असे पितांबरी प्रॉडक्ट्स क्युअर ऑन पार्टनरचे काम करणार आहेत. आर्यक सोल्युशन्स या उपक्रमाचे टेक्नोलॉजी पार्टनर आहेत. ओम पाडाळकर फोटोग्राफीच्या माध्यमातून फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी होणार आहे, तर रत्नागिरी पालिका या उपक्रमाची स्वच्छता पार्टनर आहे.

रत्नागिरी शहरात हॉटेल फ्लेवर्स, के सी जैन नगर, आनंदकल्प हॉस्पिटल शांती नगर, जोशी फूड्स फॅक्टरी आउटलेट मारुती मंदिर, उत्कर्ष स्टेशनरी आरोग्य मंदिर आणि हॉटेल कार्निवल इथे रजिस्ट्रेशनसाठी ऑफलाइन फॉर्म उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त जणांनी कोणवासीयांच्या जगासाठी आयोजित केलेल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशनने केले आहे.

स्पर्धेच्या नोंदणीसाठी इच्छुक स्पर्धकांकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंक –

https://events.fitasf.com/konkan-coastal-2025.html

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version