रत्नागिरी : रत्नागिरीत जानेवारीत होणार असलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या सरावाला (प्रॅक्टिस रन) आज सुरुवात करण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी : नवीन वर्षाचा पहिला रविवार (७ जानेवारी २०२४) रत्नागिरीला धावनगरी बनवण्याच्या उद्देशाने सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या सरावाला (प्रॅक्टिस रन) आज लाल बहाद्दूर शास्त्री जयंती आणि गांधी जयंतीचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली.
वय वर्षे १० ते वय वर्षे ६७ या वयोगटातील रत्नागिरीकर उत्साहाने या सरावात सहभागी झाले. गृहिणी, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर, आयटी प्रोफेशनल, शिक्षक, शेतकरी अशा विविध कार्यक्षेत्रातील रत्नागिरीकर आज सकाळी थिबा पॉइंट येथे जमले. वॉर्मअप सेशन झाल्यावर
२ किलोमीटर, ४ किलोमीटर आणि ६ किलोमीटरचा प्रॅक्टिस रन घेण्यात आला. त्यातील तांत्रिक गोष्टी अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे यांनी समजावल्या. सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले डॉक्टर कलकुटगी यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले.
सुवर्णसूर्य फाऊंडेशनचे संचालक आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे प्रसाद देवस्थळी यांनी वॉर्मअप सेशन घेतले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे बॉबी सावंत, श्रद्धा रहाटे, विनायक पावसकर यांनी रनर्सचे मेंटॉरिंग केले. राकेश होरांबे, योगेश मोरे यांनी फोटोग्राफी केली, नीलेश शाह आणि दर्शन जाधव यांनी सायकलवरून रूट सपोर्ट दिला. हॉटेल मथुराच्या माध्यमातून हायड्रेशन सपोर्ट ठेवण्यात आला होता. डॉ. नितीन सनगर यांनी सर्वांचे कुल डाऊन सेशन घेतले. मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई तसेच शुभम शिवलकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.
आज प्रॅक्टिस रनसाठी आलेल्या सर्वांनी गुडविल अॅम्बॅसॅडर बनून जास्तीत जास्त रत्नागिरीकरांना धावनगरी रत्नागिरी मोहिमेचा भाग बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता थिबा पॅलेस येथून आयोजित करण्यात आलेल्या पुढच्या प्रॅक्टिस रनसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण कोस्टल मॅरेथॉन टीमकडून करण्यात आले. रजिस्ट्रेशन तसेच अधिक माहितीसाठी ९१५१५५१५४७ हा संपर्क क्रमांक सर्वांना देण्यात आला.





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

