रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहाने साजरा होत आहे. गावोगावच्या शिवमंदिरांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील तृणबिंदुकेश्वर मंदिर, राजिवड्यातील काशिविश्वेश्वर मंदिर, राजापूरमधील धूतपापेश्वर मंदिर, गुहागरमधील वेळणेश्वर मंदिर, गावखडीतील रामेश्वर मंदिर यांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पावसजवळच्या कुर्धे येथील सर्वेश्वर मंदिरासह काही मंदिरांमध्ये पालखी, भोवत्या, टिपऱ्या आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत.




Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

