Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

देवस्थानांची माहिती पाठविण्याचे विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

Advertisements

चिपळूण : विश्व हिंदू परिषदेच्या उत्तर रत्नागिरी विभागातर्फे देवस्थानांविषयीची माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर विभागातील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यातील सर्व मंदिरांच्या माहितीचे संकलन करण्यात येत आहे. त्याकरिता देवस्थानाचे नाव, पत्ता, अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची नावे, मोबाइल नंबर तसेच देवस्थानातर्फे साजरे होणारे प्रमुख उत्सव याविषयीची माहिती अपेक्षित आहे. ही माहिती धनंजय सुधाकर चितळे (९४२१८९४५३२) यांच्याकडे त्यांच्या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version