रत्नागिरी : ‘उद्योजकतेचा विकास करण्याचा ध्यास मराठी माणसांनी धरायला हवा. प्रामाणिकपणा हा उद्योजकाच्या वाढीसाठी एक महत्त्वाचा गुण आहे. एकमेकांच्या साह्याने, एकजुटीने यश मिळवता येते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि नवलाई ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र सावंत यांनी केले. रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ३१व्या वार्षिक गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रत्नागिरीत नाट्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संकल्प कला मंच या नामांकित संस्थेतर्फे दर वर्षी गुरुपौर्णिमेला हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ‘गौरव गुणवंतांचा’ हा जिल्ह्यातील एकमेव असा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असल्याचे गौरवोद्गार सावंत यांनी काढले.
प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सौ. कल्पना मेहता आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे या प्रमुख पाहुण्यांसह संस्थेचे अध्यक्ष विनयराज उपरकर, सल्लागार माजी अध्यक्ष विनोद वायंगणकर आणि प्रमुख सल्लागार डॉ. दिलीप पाखरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. १० जुलै २०२५ रोजी हा कार्यक्रम झाला.
डॉ. सौ. कल्पना मेहता म्हणाल्या, ‘सर्व क्षेत्रातील गुणवंतांना हेरून त्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम अभिनव आहे. उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी व त्याला प्रोत्साहित करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असतात.’ त्यासंबंधी त्यांनी एक गुरुगौरवपर कथाही सांगितली. डॉ. शाश्वत शेरे यांनी सांगितले, की ‘संकल्प कला मंचाच्या अशा गौरव समारंभाने मानवी ऊर्जा सकारात्मक रीतीने कार्यशील होते. ‘आविष्कार’च्या निर्मितीसाठी संकल्प कला मंचाने मलाही पुरस्कार दिला होता.’
या कार्यक्रमात ३१ गुणवंतांना गौरवण्यात आले. त्यांना ‘आविष्कार’निर्मित पुष्प, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यांची यादी अशी –
रिद्धी केतन चव्हाण (क्रीडा)
तन्वी मंगेश मोरे (संगीत)
विकास शंकर साखळकर (सामाजिक)
स्वरा विकास साखळकर (क्रीडा)
हीमोफिलिया सोसायटी, रत्नागिरी चॅप्टर श्री. शिंदे (वैद्यकीय)
राजेंद्र यशवंत सावंत (पोलीस दल)
वैशाली अभिजित खाडिलकर (रक्तदान)
राज पूजा कांबळे (अपंगत्वावर मात)
सोमेश्वर शांतिपीठ संस्था, रत्नागिरी (गोरक्षण, संवर्धन)
महेश दत्ताराम बने (फेटे बांधणे)
स्मिता सुरेश साळवी (योगशिक्षण)
मनोज प्रभाकर लेते (पत्रकारिता)
नेत्रा दिलीप राजेशिर्के (गिर्यारोहण)
स्वप्नजा आशिष मोहिते (कथासंग्रह, चित्रकारी)
वृषाली वसंत टाकळे (कथासंग्रह)
डॉ. शाश्वत शेरे (अनुवाद)
मुकुंद दत्तात्रय शेवडे (काव्यसंग्रह)
ओंकार रहाटे (इंग्लिश कादंबरी)
रूपेश पेडणेकर (सामाजिक)
दुर्गेश आखाडे (कथासंग्रह)
विनायक खानविलकर (सांस्कृतिक, सामाजिक)
अमरीश अशोक पवार (प्रामाणिकपणा)
विनोद यशवंत कदम (पत्रकारिता)
महेशकुमार मयेकर (मिमिक्री कलाकार)
रक्षिता पालव (अभिनय)
कोमल सुजित सोनावणे (शैक्षणिक)
अभिषेक ज्ञानेश्वर पाटील (शैक्षणिक)
विनोद वायंगणकर (रक्तदान व सामाजिक)
ईशान धनवंत कासेकर (शैक्षणिक)
स्वरदा चंद्रकांत कांबळे (शैक्षणिक)
साहिल अतुल तांबट (शैक्षणिक)
कार्यक्रमाची सुरुवात श्री. गुरुदेव नांदगावकर यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनवंत कासेकर व सौ. सुकन्या ओळकर यांनी केले. शेवटी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सत्यविजय शिवलकर, कृष्णकांत साळवी, चंद्रकांत कांबळे, नंदकुमार भारती, रवींद्र मुळ्ये, शलाका सावंतदेसाई, गोविंद ठीक, मयूर पाडावे, साहिल तांबट, आशिष पाटील, प्रसाद सुर्वे, सागर वायंगणकर यांनी मेहनत घेतली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

