एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (३ डिसेंबर २०२२) : मावळतीचा इंद्रधनू
सादरकर्ते : संकल्प कला मंच, रत्नागिरी
वृद्धावस्थेतून निर्माण झालेल्या समस्येवर हे नाटक आधारित आहे. धकाधकीच्या जीवनात समृद्धी आली असली, तरी त्यातून सारे काही साध्य होतेच, असे नाही. सारे काही विकत घेता येते, पण भावनांचे काय, हा प्रश्न राहतो. तरुण पतीपत्नी आपल्या व्यापात व्यस्त असतात. घरातील वृद्ध आईवडिलांसाठी सर्व भौतिक सुविधा ते उपलब्ध करून देतात. त्यातील वृद्ध स्त्रीचे निधन होते. वृद्ध पती मागे राहतो. त्याल सर्व सुविधा मिंळतात. पण त्याच्याशी बोलणारा, संवाद साधणारा माणूस त्याला हवा असतो. नव्या पिढीकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे रिकामा वेळ वृद्ध व्यक्तीला खायला उठतो. तो त्याच्याशी संवादा साधणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असतो. जुन्या मैत्रिणीच्या रूपात ती साथ त्याल मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असते. आपल्या उर्वरित जीवनाचा साथीदार म्हणून तो वृद्ध तिच्याकडे पाहत असतो. पण नव्या पिढीला ते पसंत नसते. त्यातून झालेले संवाद म्हणजे हे नाटक.
श्रेयनामावली
निर्मिती प्रमुख – विनोद वायंगणकर, गजानन गुरव, गणेश गुळवणी, डॉ. दिलीप पाखरे
पार्श्वसंगीत – योगेश मांडवकर
नेपथ्य – नंदकुमार भारती, उपरकर सर
प्रकाशयोजना – विनायकराज उपरकर
रंगभूषा – प्रकाश ठीक, गोविंद ठीक
वेशभूषा – सोनम साळुंखे, आर्या शेट्ये
रंगमंच व्यवस्था – सागर वायंगणकर, शशिकांत गुरव, सानिका देसाई़
पात्रपरिचय
कृष्णकांत – कृष्णकांत साळवी
वत्सला – रक्षिता पालव
प्रशांत – धनंजय कासेकर
प्रणाली – अनुजा जोशी
थोरात काकू – शलाका संतोष देसाई
दामू – सुयोग बारगोडे
आण्णा – विनोद वायंगणकर
शिवलकर – सत्यविजय शिवलकर
नगरकर – आशीष पाटील
मुकादम – अमोल गोसावी

असे होते कालचे नाटक
काल (दि. २ डिसेंबर) श्री भैरीदेव देवस्थान समिती (जांभारी, ता. रत्नागिरी) या संस्थेने कळा या लागल्या जीवा हे नाटक सादर केले. कौटुंबिक नातेसंबंधांवरील नाजूक प्रश्नावर नाटकातून भाष्य करण्यात आले आहे.
भारताने जागतिक अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे मध्यमवर्गीय माणसाच्या हातात पैसा खुळखुळू लागला. कोणत्याही गोष्टीसाठ सहज कर्ज उपलब्ध होऊ लागले. विदेशी कंपन्या जशा भारतात आल्या, तशी काही प्रमाणात विदेशी संस्कृतीही आली. सहज मिळणारे कर्ज घेणे आणि मग त्याचे हप्ते फेडताना ओढाताण हणे हे चित्र गल्लोगल्ली दिसू लागले. कारण अंथरूण पाहून पाय पसरावेत, ही विचारसरणी जाऊन पाय पसरविण्यासाठी अंथरूण मोठे करा, ही विचारसरणी वाढू लागली. म्हणून माणसाच्या गरजा वाढल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणूस काहीही तडजोड करू लागला.
चाहूल हे नाटक पाहून आल्यानंतर अविनाश आणि गौरी या दोघांच्या संवादातून नाटकाला सुरुवात होते. नाटकात पाहिली तशीच तडजोड आपल्या जीवनात करावी, असे ठरवणारा नायक अविनाश आपल्या बायकोने, गौरीने आपल्या व्यवसायाची स्वप्ने साकार व्हावीत, म्हणून तिच्या बॉससोबत नको ती तडजोड करावी, अशी अपेक्षा करत असतो. किंबहुना ते तिला पटवून देण्यासाठीच तो ते नाटक पाहायला तिला घेऊन जात असतो. पण त्यावर पूर्ण विचार करून ही तडजोड आपण स्वीकारायची नाही, असेच ती दोघे ठरवतात आणि नाटकाचा शेवट होतो. नाटक चांगले झाले, मात्र ….
केवळ दोनच कलाकार असूनही त्यांचे संवाद पाठ नव्हते. त्यांना प्रॉम्प्टिंग केले जात होते, हे ध्वनिक्षेपकावरूनच स्पष्ट ऐकू येत होते……
कळा ज्या लागल्या जीवा नाटकातील काही क्षणचित्रे
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

