सहकारी सप्ताहानिमित्त रत्नागिरीत विविध कार्यक्रम

रत्नागिरी : ७२व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहानिमित्त रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या वतीने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी शहरातल्या विविध महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज या सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातल्या मुख्य बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना सहकाराचे फायदे सांगून महत्त्व पटवून दिलं. सहकारविषयक माहिती देणाऱ्या एका विशेष पुस्तिकेचं व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना वितरण करण्यात आलं. या वेळी रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजू, उपाध्यक्ष प्रताप सावंत, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, जिल्हा सहकारी बोर्डाचे मुख्याधिकारी ए. आर. कळंत्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या माध्यमातून सहकार चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं अध्यक्ष हेमंत वणजू यांनी सांगितलं.

 

This slideshow requires JavaScript.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply