पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त रत्नागिरीतील शिवमंदिरांमध्ये गर्दी

रत्नागिरी : आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त रत्नागिरीतल्या शिवमंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. राजिवड्यातलं काशिविश्वेश्वर मंदिर, रत्नागिरी शहरातलं तृणबिंदुकेश्वर देवस्थान, भागेश्वर मंदिर, राजापुरातलं धूतपापेश्वर मंदिर, तसंच संगमेश्वर तालुक्यातल्या मारळ इथलं प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थान यांसह गावागावांमधली शिवमंदिरं आज गजबजली आहेत. दरम्यान, मार्लेश्वर देवस्थानात आता ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. भारतीय संस्कृतीला साजेसा, पूर्ण आणि अंगभर वेश परिधान करूनच मंदिरात यावं, असं ट्रस्टने म्हटलं आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply